Thursday, 24 July 2014

सहज सुचालेले


माझे मन तुझे झाले हि माझी आवडती मालिका .... त्या मध्ये शेखर देसाईचा रोल एक प्रोफेसरचा आहे . गेले दोन तीन भाग पासून त्याच्या वर अडमिशन साठी पैसे मागितले असा आरोप होतो हे दाखवत आहे . कालचा एक प्रसंग एक पत्रकार फोन करतो आणि त्यांना सांगतो तुम्ही फोन घेत नाही म्हणजे तुम्ही दोषी आहे . आणि माझा वर अब्रू नुकसानचा दावा करायला तुमच्या सारख्या प्रोफेसर कडे एव्हडे पैसे आहे म्हणजे तुम्ही नक्कीच पैसे खाले . कॉलेजची मुले आणि प्राचार्य पण त्याच्या वर विस्वास ठेवत नाही . *एक साधा प्रसंग आहे हा मालिके मध्ये ..... पण खूप विचार करयला लावणारा अनेकदा आपण असे आरोप झालेले लोकांना आपण बघतो . आणि आपण त्यांना दोषी ठरवतो पण आपण कधी विचार करत नाही खरच ती व्यक्ती दोषी असेल का तिनी हा अपराध केला असेल का ? मिडिया जे दाखवते किवा न्यूज पेपर जे लिहितात तेच आपण खरे समजतो . अनेकदा त्या व्यक्ती दोषी देखील नसतात . मग असे परिवार बदनामी सहन करू शकत नाही . घर उद्वस्त होते. ज्या व्यक्ती वर आरोप झाला ती व्यक्ती दोषी नसेल तर आत्महत्या देखील करते . पण जेव्हा एखादी व्यक्ती या विरुद्ध लढते आणि स्वताला निर्दोष साबित करते.तेव्हा कधी कोणत्या पेपर मध्ये किवा मिडीया मध्ये हि बातमी नसते . म्हणजे ज्यांनी ज्यांनी ती बातमी बघितली होती तीच त्याच्या साठी खरे असते . त्याच्या मनात हि व्यक्ती कायम दोषीच राहते . म्हणजे काय जे विकते तेच दाखवयचे तेच लिहीयाचे . {सावधान इडिया फाईट ब्याक मध्ये देशभर गाजलेला एक भाग दाखवला होता कोलकत्त्याच्या होता कदाचित .एक चांगल्या शिक्षका वर एक मुलीनी विनयभंगाचा आरोप केला होता .ती त्याच्यावर प्रेम करत असते आणि त्याचा लग्न दुसरी कडे होणार म्हणून हे सगळे होते .पण मिडीया अनेक संघटना हे प्रकरण उचलून धरतात .त्याचे घरा बाहेर पडणे मुश्कील होते मग तो शिक्षक आत्महत्या करतो शेवटी तो लिहितो आई वडिलांना मी निर्दोष आहे . आणि त्याच दिवशी हि मुलगी हे खोटे आहे हे पोलिसाना सांगते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो .} एखादी बातमी देतानी विचार करयची गरज का नाही वाटत .का फक्त आम्हीच सगळ्यात आधी बातमी दिले हे सांगयची घाई फक्त .

स्वभाव

आज वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते .
दोन शेजारी राहणार्या बायका असतात आणि मैत्रिणी पण .
एक जरा नेहमी त्रागा करणारी आणि एक शांत,
त्याच्यात वाद होतो मग दोघी एकमेकीचे तोंड बघयला तयार नसतात
पण त्रागा करणारी मात्र काही न काही कारणानी तिला त्रास देत राहते .
मग त्याचे नेहमी भांडण आणि लोकंची करमणूक .
शांत बाईला काय करावे समजत नाही .मग तिला तिचे वडील
एक आयडिया देतात.जेव्हा समोरची बाई तुला काही बोलणार तेव्हा तिला काही उत्तर
दयाचे नाही फक्त तिचा कडे बघून ठेंगा {अंगठा }दाखवायचा . मग बघ .
दुसर्या दिवसा पासून ती तसेच करते समोरची काही बोलु लागली कि
न बोलता तिला फक्त ठेंगा दाखवायची .
याचा परिणाम समोरील बाई खूप चिडायची आणि अजून आक्रस्ताळेपणा
करायची याचा परिणाम काही दिवसांनी लोकना वाटायला लागले .
समोरील बाई काही बोलत नाही ती तर शांत आहे म्हणजे .
तिची काही चूक नाही आहे .आणि लोक मग त्रागा करणर्या बाईला
नावे ठेवायला लागली .तिच्या पासून दूर राहायला लागले .
याचा परिणाम ती सगळा राग काही झाले तरी शांत बाई या गोष्टीला
जबाबदार आहे असा आरडाओरडा करयला लागली .
उलट शांत बाई सगळ्या लोकांना आवडायला लागली .
{सध्या काही नेत्याचे जे चालू आहे त्या वरून हि गोष्ट आठवली
आता तुम्हीच ठरवा कोण ते }

संत ..कान्होपात्रा



आषाढ महिन्यातील आज दुसरी एकदशी ......
विठू माउलीचे अनेक भक्त होते तशीच एक
कान्होपात्रा हि एक.
ती एका नायकीणीची मुलगी होती मंगळवेढ्यात राहणाऱ्या शामा नायकीणीची ती मुलगी होती .अतिशय 
सुंदर जशी चिखलात कमळ उमलते तशी .
नायकीणीची मुलगी असून देखील तिला देवाचे वेड होते .
ती सुंदर अभंग गायची ,तिचा गाण्याची आणि तिच्या सौदर्याची
चर्चा बेदरचा बादशहाच्या कानी पडली. त्यांनी आपले शिपाई
कान्होपात्रा कडे पाठवले जर येण्यास नकार दिला तर तिला उचलून
आणण्याची धमकी दिली शिपाई आल्यानन्तर कान्होपात्रा अजिबात
डगमगली नाही .कारण या मधून आपला पाडुरंग आपल्याला बाहेर काढणार
अशा तिला विस्वास होता .तिनी शिपयाना सांगितले कि तुम्ही थांबा मी देवाची
पूजा करून येते.देवळात गेल्यावर तिनी पाडुरंगाच्या चरणी आपले मस्तक ठेवले.
त्यावेळी तिच्या तोडून अतिशय प्रसिद्ध अभंग रचला गेला .

!! नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात !!

असे बोलून ती देवा कडे गेली
ती बाहेर येत नाही बघून शिपाई आत गेले तर तिचे मृत शरीर त्यांना दिसले .

हा अभंग पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय आर्त स्वर मध्ये गायला आहे .कान्होपात्राची व्याकुळता दिसते त्या मध्ये आणि तो आज देखील खूप प्रसिद्ध आहे

गटारी अमावस्या


काही अनेक चुकीच्या गोष्टी जमाना बदलला या नावा खाली रूढ होत आहे.उद्या आषाढ अमावस्या ,खरे तर हि अमावस्या म्हणजे दीप पूजनाची अमावस्या पण आज ती फक्त ओळखली जात आहे गटारी अमावस्या म्हणून.आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण गटारी आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे.
पण या अमावस्याला गटारी नाव कसे पडले असेल .कदाचित पूर्वी लोक
दारूपिणे वाईट समजत असत .त्यामुळे कमीतकमी श्रावणात मांसहार
आणि दारू पिणे बंद ठेवत असणार .पण त्या आधी श्रावण सुरु होण्या आधी
एक दिवश येणर्या अमावस्याला भरपूर दारू पीत असणार आणि कुठे लोळत
असणार .दारू पिणे वाईट म्हणून मग अशा व्यक्ती बद्दल बोलातानी हे शब्द
रूढ झाला असावा का ?
गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
एखाद्या सणा सारखा हा उत्सव साजरा केला जात आहे .
"तमसो मा ज्योतिर्गमय"
पूर्वी आजच्या सारख्या लाईट नव्हते .सगळीकडे दिवे लावले जायचे .
अंधकार दूर करणारे या दिव्याची पूजा केली जात असे घरात असलेले सगळे
दिवे लख्ख धुऊन पुसुन त्यांची पुजा केली जाते.
"दिव्यांची अवस", जरी खरं असल तरी आज किती जणांना हे माहित आहे?
खरे तर दीप पूजा नन्तर दुसऱ्या दिवशा पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरवात
होते आणि ती या अमावस्याला दीप पूजा करून होते .
म्हणून हि अमावस्या "दिव्यांची अवस", म्हणून ओळखली जात असावी
पण या अमावस्याला गटारी नाव कसे पडले असेल .कदाचित पूर्वी लोक दारूपिणे वाईट समजत असत .त्यामुळे कमीतकमी श्रावणात मांसहार आणि दारू पिणे बंद ठेवत असणार .पण त्या आधी श्रावण सुरु होण्या आधीएक दिवश येणर्या अमावस्याला भरपूर दारू पीत असणार आणि कुठे लोळत असणार .दारू पिणे वाईट म्हणून मग अशा व्यक्ती बद्दल बोलातानी हे शब्द रूढ झाला असावा का ?गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.एखाद्या सणा सारखा हा उत्सव साजरा केला जात आहे ."तमसो मा ज्योतिर्गमय"पूर्वी आजच्या सारख्या लाईट नव्हते .सगळीकडे दिवे लावले जायचे .अंधकार दूर करणारे या दिव्याची पूजा केली जात असे घरात असलेले सगळेदिवे लख्ख धुऊन पुसुन त्यांची पुजा केली जाते. "दिव्यांची अवस", जरी खरं असल तरी आज किती जणांना हे माहित आहे?खरे तर दीप पूजा नन्तर दुसऱ्या दिवशा पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरवात होते आणि ती या अमावस्याला दीप पूजा करून होते . म्हणून हि अमावस्या "दिव्यांची अवस", म्हणून ओळखली जात असावी