Friday, 21 February 2020

दार

घर म्हटले कि त्यला एक दार असते .....
आणि तसेच शरीर म्हटले कि त्याला पण एक मन असते ....
 सगळ्या साठी जशी घराची दारे सताड उघडी नसतात.... .
काही खास लोक साठीच ती २४ तास उघडी असतात.. .
तसाच मनाचे पण आहे मनाची दारे पण नसतात उघडी सगळ्या साठी,..
दोघा मध्ये किती सारखे पण आहे ना .पण आहे एक फरक काही माणसे नाही आवडले तर त्याच्या साठी घराचे दार बंद करता येतात. ..
पण मनाचे काय आवडणारे आणि ना आवडणारे माणसे जेव्हा मनाच्या दारावर येतात तेव्हा ती दारे बंद पण करता येत नाही किती पण प्रयत्न केले तरी फक्त मनाचे दार बंद करण्याचे सोंग करता येतात .
 मनाचे काय असते खूप सारे स्वप्न गगनला भरारी घालयचे . .जे आपले नाही ते भेटत नाही तो पर्यन्ता त्याचा पिच्छा करयचा ,भेटल्या वर मग त्याची किमत मना साठी झिरो . .
पण घरच्या दाराला नसतात स्वप्नं,भावना ,आशा,निरशा कोण येते जाते त्याला त्यचे काही नसते .नसतात जखमा ,
पण मनच्या दारांना आशा , निरशा ,भावना ,सगळे असते दाराचे अस्तित्त्व किती जोपर्यंत त्यच्या वर ओरखडे येत नाही , लाकूड खराब होत नाही तो पर्यंत.तरी त्याचे उरते निर्जीव अस्तित्वा.
प्रत्यक दाराची कहाणी वेगळी असते . मन असते मोठे.कारण दाराला नसतात स्वप्नं,धेय्य आणी संकटाचे आयुश्य.मनाला सारे असते.मन जिंकून आणते सारे,कितीही खचले तरीही.त्याच्या कार्यशक्ती आणि जिद्दीने.आणि मग शेवटी विजय होतो मनाच्या दारांचा,जो असतो ठरलेला.कारण घराच्या दाराचे शरीर जळल्यावर..उरते फक्त राख.पण मन कितीही खचल...तरीही उरते त्याचे अस्तित्व शेवटपर्यंत.
{अस्मिता बागुल यांच्या पोस्ट वरून सुचलेले } .

मन

                                                  मन 

आपल्यला अगदी बालपणा पासून ते जीवनच्या अखेर पर्यंत अनेक माणसे भेटतात.मग त्या मध्ये आपले शेजारी, आपले नातेवाईक ,आपले शिक्षक ,आणि आपले मित्र ,अनेक जण असतात.पण काही व्यक्ती आपल्यला खूप आवडतात .काही तर असे  असतात त्यांच्याशी  आपण कधी बोलत पण नाही तरी देखील त्याच्या बद्दल आपल्या मनात खूप आदर असतो आणि  त्यांना आपण कधी विसरत नाही .या उलट काही व्यक्ती असा असतात त्या खूप काही करतात आपल्या साठी तरी देखील त्या आपल्यला आवडत नाही.आपण त्यांचा राग करतो असे पण नसते .शेवटी काय माणसाचे मन हे खूप अजिब असते .

Wednesday, 11 October 2017

दिवाळी पहाट

मी मज हरपून बसले ग
मी मज हरपून बसले ग

माझं वेड मन सारखा हेच गाणं गुणगुणत होता .
अर्थात तुज पाहता मी खरंच भान हरपुन बसले ,
त्या दिवाळी पहाट ला माझ्या समोर अचानक येऊन उभा असलेला तू .
शाळेत असताना तुला मी आवडायचे हे मला सोडून सगळ्यांना माहीत होतं ...
आणि मला जेव्हा समजलं तेव्हा तू कुठे होतास हे पण मला माहित नव्हतं
मला ही तू तेवढाच अवडायचास पण सारं काही अर्धवट राहिलं
आणि मी पण सगळं विसरून गेले
आता मी जॉब ला आहे आणि तू काय करतोस मला माहित नाही
पण तू समोर आलास आणि लगेच आपण एकमेकांना ओळखलं
अनेक प्रश्न घेऊन आपण एकमेकांना बघत होतो
पण तुझे मित्र तुला घेऊन गेले
आपण अबोल राहिलो
पण ती 2 मिनिटे मला आयुष्यभर लक्षात राहतील
मला तुझी व्हायला आवडेल
नियतीने पुन्हा भेटवलं तर .....

Friday, 31 March 2017

गुढी पाडवा



गेल्या काही वर्षात नवीन वर्ष मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जाते .त्यामुळे गिरगाव येथे निघणाऱ्या शोभा यात्रेत गर्दी वाढू लागली आहे.अर्थातच सोशल मीडियाचा प्रभाव त्यामुळे कुठून कुठून लोक इथे येतात.
मी तर इथेच लहानाचा मोठा झालो सगळे मित्र मैत्रिणी आम्ही धम्माल करतो दर वर्षी .
मी मस्त फेटा आणि सफेद झब्बा घालून फिरत होतो .रुबाबदार दिसत होतो असे बरेच जण बोलले मला .
ऊन खूप होते,एका मित्राची वाट बघत मी सावलीत उभा होतो. सगळीकडे सुंदर मुलं मुली कोण कुठे सेल्फी
काढत आहे तर कोण कोणाला शोधताय .काही गर्मीत वैतागलेले .काही मुलींना नऊवारी सांभाळता येत नव्हती तर काही मुलांना मुली ..
गार्मिने एवढा घाम येत होता .तेवढ्यात वाऱ्याची एक झुळुक आली .आणि माझ्या समोर ती आली उन्हा मूळे लाल झालेला चेहरा, त्या आकाशी  नऊवारी मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती आणि मी तिच्या कडे बघतच राहिलो.
अचानक तिची नजर माझ्याकडे  गेली  आणि तिने चक्क माझा कडे बघून smile केले. मला काही समजेना ,
मी पण त्या क्षणीं तिला हाय केले.आणि ती निघून गेली .माझ्या जीवाला घोर लावून ,
कोण होती ती ?
नाव काय....?
परत कधी भेटेल का ?
आणि मी तिला दुसऱ्या रूपात ओळखेन का ..?
दोन दिवसात पासून तिचाच चेहरा दिसतोय
काय माहित आता फक्त वाट बघतोय ती पुढचा पाडवा येण्याची .
बस एवढीच होती गोष्ट या इवल्याश्या जगातली......

Thursday, 16 March 2017

गच्ची


सगळी कडे शांतता होती, रात्रीचा १ वाजला होता आणि त्या हॉटेल च्या गच्चीत ते दोघं समोर एकमेकान कडे नुसते बघत उभे होते, आकाशात खूप साऱ्या चांदण्या होत्या चंद्राच्या सुंदर प्रकाश पडला होता ,मनात खूप सारे प्रश्न घेऊन ते एकमेकान कडे बघत बसले .
काही वर्ष पूर्वी दोघं एकाच कॉलेज मध्ये शिकत होते,चांगले मित्र होते कॉलेज संपलं आणि ते स्वताच्याच जगात गुंग झाले ,आठवणी तर येत होत्या पण काय माहित मेसेज करावा कि नाही यात सगळा राहून गेलं,
आज तो त्याच्या बायको सोबत बाहेर आला होता आणि ती एका मीटिंग साठी
जग खूप छोटं आहे तिला नेहमी वाटायचा तो आपल्याला परत भेटेन कधी तरी कुठेतरी.....

लिफ्ट मध्ये त्यांची भेट झाली आणि ती लिफ्ट त्या गच्ची वर येऊन थांबली...
तिथे ते दोघेच होते
फक्त दोघे शब्दही नव्हते
त्याला त्याच्या बायकोचा कॉल आला आणि तोः लिफ्ट मधुन  परत गेला एका अनोळखी माणसा सारखा तिला परत एकटीला सोडून कायमचाच.....

ती गच्ची वर तशीच आकाशाकडे पाहत राहिली .............
दुरून गाण्याचा आवाज येत होता
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या 
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, 
अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्‍नात सावल्यांची 
कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला 
तुझ्याच जे अंतरात आहे ... 
बस एवढीशीच होती गोष्ट या इवल्याश्या जगातली :)

Sunday, 12 March 2017

बुरा न मानो होली है !!

बाहेर गोंगाट कानावर येत होता .नको वाटत होता तो आवाज ,दोन्ही कान बंद करून पण हा गोंगाट का कानावर येतो आहे ."नाही ऐकायचा मला हा आवाज "
म्हणे बुरा न मनो होळी है मला विचारा कितना बुरा होता हैं ये त्याव्हर !
एक वर्षा पूर्वी किती सुंदर होते माझे आयुष्य .
एकुलती एक मुलगी म्हणून किती लाडात वाढवले मला.
अभ्यासात हुशार होते मी .कॉम्पुटर इंजिनियर झाले .कुठेतरी छान नोकरी भेटली असती मला, पण मी निवडले शिक्षण क्षेत्र .एक कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी भेटली मला .कॉलेजचे ते वातावरण खूप आवडायचे मला.आजूबाजूला डोळ्यात खूप स्वप्न घेऊन फिरणारी ती मुले .खुश होते मी .घरा पासून फक्त तीन किलोमीटर वर कॉलेज होते .बाबानी छान स्कुटर घेऊन दिली होती .एक दिवस उशीर झाला .स्कुटर वेगात चालावताना अचानक स्कुटर स्लीप झाली काही कळण्या आधी रोडवर पडले मी .पाठी मागून एकदम जवळ येऊन एक गाडी थांबली त्यातून एक मुलगा उतरला .त्याने हात दिला ,उठवले पाणी दिले .स्कुटर उचलून दिली .पुन्हा पुन्हा मॅडम लागले तर नाही विचारात होता .मी मात्र त्याच्या कडे वेंधळ्या सारखी बघत होते .पडल्यामुळे केसाचा क्लिप तुटून केस मोकळे सुटले याचे मला भान नव्हते .तो मात्र माझा सुटलेल्या केसात हरवला होता .तीच माझी आणि त्याची पाहिले ओळख .नंतर भेटी होत गेल्या .काहो दिवसात लग्न ठरले .दिवस कसे भुरकून उडून जात होते,किती ती लग्नाची खरेदी .कुठे जायचे काय काय करायचे .दिवसातील किती वेळ फोन वर बोलण्यात जात होता .दोन दिवसाने होळी होती .त्या दिवशी आम्ही मस्त एक हॉटेल मध्ये डिनर केला .खूप सारे स्वप्न घेऊन मी त्याचा निरोप घेतला आणि घरी निघाले .आज सगळं कसं सुंदर वाटत होते .मस्त वातावरण होते .अचानक रस्त्यावर काही मुले येताना दिसली खूप मोठे टोळके होते ते ,मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत ते रंग खेळत होते,मीबाजूने जात होते .त्यातील काही मला माझा कडे येताना दिसले .दुसर्याच क्षणी मी जोरात किंचाळे ह.डोळे प्रचंड जळत होते .बुरा न मनो होळी चा आवाज कनावर येत होता .मी स्कुटर सहा पडले .बाजूचा आवाज शांत झाला .कोणी तरी मला घेऊन जात होते .नंतर हॉस्पिटल मधील वास .काही वेळाने शुद्ध गेली .
खूप वेळाने शुद्दीवर आले मी ,"तिच्या डोळ्यांना रंगा मधील केमिकल मुळे इजा झाली " ,एवढेच आपण ऐकले नकळत हात डोळ्या कडे गेले ,मोठे बँडेज हाताला लागले .माझी दृष्टी गेली होती ,त्या दिवशी माझ्या चेहरा खराब झाला होता ,तो कायमचाच ,काही दिवस तो येत राहिला .माझी नजर परत येईन की नाही .सांगता येणार नाही हे समजले आणि माझा नजरे सारखा तो मला सोडून गेला .हा दुहेरी आघात आज हि आपण पचवू नाही शकलो ..... आणि म्हणे बुरा न मानो होली है !
असे किती असतील या उत्सवाचे बळी होत असतील .माझा सारखे कायमचा एकच रंग घेऊन जगायला मजबूर फक्त काळा आणि काळा .
माझ्या इवल्याश्या जगातली हि एक जग उध्वस्त करणारी गोष्ट .
होळी खेळ पण कोणाचं जग उध्वस्त करू नका.....
happy holi.
Photo credit:- Harsh Salvi Photography
Story by :- Kishoree Melodious Londhe
गच्ची

सगळी कडे शांतता होती, रात्रीचा १ वाजला होता आणि त्या हॉटेल च्या गच्चीत ते दोघं समोर एकमेकान कडे नुसते बघत उभे होते, आकाशात खूप सार्या चांदण्या होत्या चंद्राच्या सुंदर प्रकाश पडला होता ,मनात खूप सारे प्रश्न घेऊन ते एकमेकान कडे बघत बसले .
काही वर्ष पूर्वी दोघं एकाच कॉलेज मध्ये शिकत होते,चांगले मित्र होते कॉलेज संपला आणि ते स्वताच्याच जगात गुंग झाले ,आठवणी तर येत होत्या पण काय माहित मेसेज करावा कि नाही यात सगळा राहून गेलं
आज तो त्याच्या बायको सोबत बाहेर आला होता आणि ती एका मीटिंग साठी
जग खूप छोटा आहे तिला नेहमी वाटायचा तो आपल्याला परत भेटेन कधी तरी कुठेतरी.....

लिफ्ट मध्ये त्यांची भेट झाली आणि ती लिफ्ट त्या गच्ची वर येऊन थांबली...
तिथे ते दोघेच होते
फक्त दोघे शब्दही नव्हते
त्याला त्याच्या बायकोचा कॅल आला आणि तोः लिफ्ट मधु परत गेला एका अनोळखी माणसा सारखा तिला परत एकटीला सोडून कायमचाच.....

ती गच्ची वर तशीच आकाशाकडे पाहत राहिली .............
दुरून गाण्याचा आवाज येत होता
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या 
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, 
अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्‍नात सावल्यांची 
कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला 
तुझ्याच जे अंतरात आहे ... 
बस एवढीशीच होती गोष्ट या इवल्याश्या जगातली :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पिंजरा

दुनिया गोल आहे ,मला नेहमीच वाटतं
आम्ही आधी चाळीत राहत होतो आत्ता तिथे कॉंक्रिट च्या मोठ्या मोठ्या इमारती झाल्या
चाळीत राहत असताना तिथे एक काका काकू राहत होते
त्यांना एक मुलं आणि एक मुलगी होती पण तरी त्यांची जोडी पहिली कि असा वाटायचं कि खरा प्रेम असा असत.
ते दोघं खूप  छान वाटायचे सोबत
आज मी पुण्याला जायला निघाले . दादर वरून बस पकडन्यासाठी धावत पळत गेले
बस मध्ये जाऊन बसले तेव्हा निवांत स्वास सोडला
बाजूला बघते तर खूप वर्षांनी त्या काकू माझ्या समोर आल्या
मला खूपच आनंद झाला
पण त्या एकट्याच होत्या कसा आहे कायम त्यांना सोबत बघायची सवय झाली होती
आम्ही बोलू लागलो
हळू हळू मला समजला त्या एका सुंदर पिंजऱ्यात बंदिस्त होत्या '
काही गोष्टी दिसतात तश्या  नसतात
काकांना त्यांनी कोणाशी बोललेलं देखील आवडत नव्हता
संशयी स्वभाव , रोजचा त्रास पण कोणाला काय सांगणार
बाहेरच्यांना नेहमीच ते एक सुंदर खुश जोडपं वाटायचं
काकांच्या बोलण्यातला दुःख तीव्र पाने जाणवत होता

३ तास कसे संपले समजलाच नाही
माझा  स्टॉप आला आणि मी उतरले
खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसतात पण त्या तश्या नसतात
बस एवढीशीच होती इवल्याश्या जगातली गोष्ट..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पहिला मेट्रो प्रवास

जुई एक नवीन लग्न झालेली मुलगी..
नाशिकला राहणारी जुई आता लग्न होऊन मुंबईत अली होती
पदवीधर ती शिक्षण संपताच लग्न करून दिला
लग्नाला तरी महिना झाला होता
आता दिवसभर घरी बसून काय करायचा
तिने असाच नेट वर अँप्लिकेशन्स देऊन ठेवलेले
काल संद्याकाळी तिला एका नोकरीची ऑफर अली
वर्सोवा ला राहणाऱ्या तिला जॉब चाकाला इथे मिळाला
आता घरी कसा सांगावा
सकाळी नास्ता करताना तिने हे सगळणं सांगितलं
आणि घरात छोटा तुफानाच आला
सासू सासरे नणंद सगळे बोलले कि काय गरज या जॉब ची
मुळात आपण शीमंत असताना जॉब करायचाच का ?
तू आत्ता आलीस आणि रंग दाखवायला सुरु केलास
तुला मुंबई चा काही माहित तरी आहे का ?
असे अनेक बोचरे प्रश्न
तिने तिच्या घाबरलेल्या नजरेने नवर्याकडे पहिला
तो म्हणाला आता तू निर्णय घेतलाच आहेस ना
आता मला नको विचारूस
आणि घाबरायचं काय त्यात ,तुला हवा ते कर
असा बोलून तो ऑफिस ला गेला
तिला काहीच कळेना कि नवरा तरी आपल्या बाजूने आहे कि नाही
रंगवलाय कि खरंच मन पासून बोलला य
घरातून आवरून ती निघाली
मनात खूप विचार ,घाबरलेली ती मेट्रो स्टेशन वर अली
सगळी कडे माहितीचे बोर्ड लिहलेलेच होते
तिकीट काढून ती प्लॅटफॉर्म वर आली
तिचा हा पहिला प्रवास
पहिली ट्रेन तर तिने अशीच सोडून दिली कारण त्या मेट्रो चे दरवाजे आपोआप बंद होतात तिला भीती वाटली
पुढच्या ट्रेन मध्ये हिम्मत कडून चढली
एका मुलीला स्टेशन विचारला
ती उतरली आणि समोर तिचा नवरा उभा होता ,तिला बघून खूप खुश होता
मला माहित होता तू करशील
i am proud of u
ill support u to b independent.
love u
असा बोलून तो तिला घेऊन गेला ऑफिस पर्यंत....
या इवल्याश्या जगात खूप काही घडत फक्त आपण त्या गोष्टीला कसे सामोरे जातो हे महत्वाचा
म्हणूनच तर डर के आगे  जीत है दोस्तो....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------




बुरा न  माो होळी है .

बाहेर गोंगाट कानावर येत होता .नको वाटत होता तो आवाज ,दोन्ही कान बंद करून पण हा गोंगाट का कानावर येतो आहे ."नाही ऐकायचा मला हा आवाज "
म्हणे बुरा न  मनो होळी है मला विचारा  कितना बुरा होता हैं ये त्याव्हर !
एक वर्षा पूर्वी किती सुंदर होते माझे आयुष्य .
एकुलती एक मुलगी म्हणून किती लाडात वाढवले मला.
अभ्यासात हुशार होते मी .कॉम्पुटर इंजिनियर झाले .कुठेतरी छान नोकरी भेटली असती मला, पण मी निवडले शिक्षण क्षेत्र .एक कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी भेटली मला .कॉलेजचे ते वातावरण खूप आवडायचे मला.आजूबाजूला डोळ्यात खूप स्वप्न घेऊन फिरणारी ती मुले .खुश होते मी .घरा पासून फक्त तीन किलोमीटर वर कॉलेज होते .बाबानी छान स्कुटर घेऊन दिली होती .एक दिवस उशीर झाला .स्कुटर वेगात चालावताना अचानक स्कुटर स्लीप झाली काही कळण्या आधी रोडवर पडले मी .पाठी मागून एकदम जवळ येऊन एक गाडी थांबली त्यातून एक मुलगा उतरला .त्याने हात दिला ,उठवले पाणी दिले .स्कुटर उचलून दिली .पुन्हा पुन्हा मॅडम लागले ते नाही विचारात होता .मी मात्र त्याच्या कडे वेंधळ्या सारखी बघत होते .पडल्यामुळे केसाचा क्लिप तुटून केस मोकळे सुटले याचे मला भान नव्हते .तो मात्र माझा सुटलेल्या केसात हरवला होता .तीच आपली आणि त्याची पाहिले ओळख .नंतर भेटी होत गेल्या .काहो दिवसात लग्न ठरले .दिवस कसे भुरकून उडून जात होते,किती ती लग्नाची खरेदी .कुठे जायचे काय काय करायचे .दिवसातील किती वेळ फोन वर बोलण्यात जात होता .दोन दिवसाने होळी होती .त्या दिवशी आम्ही  मस्त एक हॉटेल मध्ये डिनर केला  .खूप सारे स्वप्न घेऊन मी त्याचा निरोप घेतला आणि घरी निघाले .आज सगळं कसं सुंदर वाटत होते .मस्त वातावरण होते .अचानक रस्त्यावर काही मुले येताना दिसली खूप मोठे टोळके होते ते ,मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत ते रंग खेळत होते,मीबाजूने जात होते .त्यातील काही मला माझा कडे येताना दिसले .दुसर्याच क्षणी मी जोरात किंचाळे ह.डोळे प्रचंड  जळत होते .बुरा न मनो होळी चा आवाज कणावर येत होता .मी स्कुटर सहा पडले .बाजूचा आवाज शांत झाला .कोणी तरी मला घेऊन जात होते .नंतर हॉस्पिटलचा वास .काही वेळाने शुद्ध गेली .
खूप वेळाने शुद्दीवर आले मी ,"तिच्या डोळ्यांना रंगा मधील केमिकल मुळे इजा झाली " ,एवढेच आपण ऐकले नकळत हात डोळ्या कडे गेले ,मोठे बँडेज हाताला लागले .माझी दृष्टी गेली होती ,त्या दिवशी माझ्या  चेहरा खराबझाला होता ,तो कायमचाच ,काही दिवस तो येत राहिला .माझी नजर परत येईन की  नाही .सांगता येणार नाही हे समजले आणि माझा नजरे सारखा तो मला सोडून गेला .हा दुहेरी आघात आज हि आपण पचवू नाही शकलो  ..... आणि म्हणे बुरा न मानो होली है !
असे किती असतील या उत्सवाचे बळी होत असतील .माझा सारखे कायमचा एकच रंग घेऊन जगायला मजबूर फक्त काळा आणि काळा .
माझ्या इवल्याश्या जगातली हि एक जग उध्वस्त करणारी गोष्ट .
होळी खेळ पण कोणाचं जग उध्वस्त करू नका.....
happy holi.















Tuesday, 17 January 2017

दादर

रोजच्या सारखी कॉलेजला जात होते .ट्रेन आली .तशी फारशी गर्दी नव्हती .छान खिडकी मधील जागा भेटली .सवय नुसार हेडफोन कानात घातला .एफ एम चालू केले .छान गाणे चालू होते .एक एक स्टेशन मागे जात होते .पुढचे स्टेशन दादर ,अशी अनाऊंसमेंट झाली त्याच वेळी एफ एम वर गाणे सुरु झाले .
"जिंदगी का सफर
हैं ये कैसा सफर
कोई समझा नही
कोई जाना नही....."
मी दादर स्टेशन वर उतरले .माझ्या समोरअसे दृ्य होते .कोणी ट्रेन पकडण्या साठी धावते तर कुठे तरी प्रेग्नंट महिला स्वतःला सांभाळत एका बाजूला खांबाला पकडून एकटी उभी  आहे .कुठे रडणाऱ्या मुला कडे दुर्लक्ष करून वैतागलेली आई त्याला खेचत घेऊन चालली आहे .कुठे वयस्कर व्यक्ती या गर्दीत स्वतःला वाहून घेता येत नाही म्हणून एक जागी उभी आहेत .कुठे कोपऱ्यात पुन्हा पुन्हा घड्याळ बघत एखादी प्रियकर /प्रेयसी एक दुसऱ्याची वाट बघत आहे .कुठे आज काही काम न भेटल्या मुळे उदासवाणे मजूर स्टेशन वर बसून आहे .एक ट्रेन येते एक जाते कोण येते कोण जाते .जो तो आपल्या  जीवनाचा भार वाहत आहे असे वाटते .
खरे तर नेहमी हे दृश्य हि गडबड दादर स्टेशनची शान आहे .येथे जीवन धावताना दिसते .लोक जगतात प्रोब्लेमना घेऊन आणि स्वताच त्याचे सोलूशेन शोधात ...
कोणी कोणा साठी थांबत नाही .
त्याच वेळी दुसरे गाणे सुरु झाले .
"ये जीवन हैं
इस जीवन का
यही हैं
यही हैं रंग रूप ....."

Sunday, 5 June 2016

फरक

माझे डोळे खूप दुखत आहे .हे वाक्य १८ वर्षाच्या मुलाचे होते ..
.
.
.
.अर्थात एक दिवसभर शेतात काम करणारा .
तर एक दिवसभर मोबाइल वर चाट करणारा आणि गेम खेळणारा ..
.
.
.
वेदना सारख्या पण एकात मजबुरी आणि दुसर्यात टाईमपास .(kisho)