मी मज हरपून बसले ग
मी मज हरपून बसले ग
माझं वेड मन सारखा हेच गाणं गुणगुणत होता .
अर्थात तुज पाहता मी खरंच भान हरपुन बसले ,
त्या दिवाळी पहाट ला माझ्या समोर अचानक येऊन उभा असलेला तू .
शाळेत असताना तुला मी आवडायचे हे मला सोडून सगळ्यांना माहीत होतं ...
आणि मला जेव्हा समजलं तेव्हा तू कुठे होतास हे पण मला माहित नव्हतं
मला ही तू तेवढाच अवडायचास पण सारं काही अर्धवट राहिलं
आणि मी पण सगळं विसरून गेले
आता मी जॉब ला आहे आणि तू काय करतोस मला माहित नाही
पण तू समोर आलास आणि लगेच आपण एकमेकांना ओळखलं
अनेक प्रश्न घेऊन आपण एकमेकांना बघत होतो
पण तुझे मित्र तुला घेऊन गेले
आपण अबोल राहिलो
पण ती 2 मिनिटे मला आयुष्यभर लक्षात राहतील
मला तुझी व्हायला आवडेल
नियतीने पुन्हा भेटवलं तर .....