Friday, 21 February 2020

दार

घर म्हटले कि त्यला एक दार असते .....
आणि तसेच शरीर म्हटले कि त्याला पण एक मन असते ....
 सगळ्या साठी जशी घराची दारे सताड उघडी नसतात.... .
काही खास लोक साठीच ती २४ तास उघडी असतात.. .
तसाच मनाचे पण आहे मनाची दारे पण नसतात उघडी सगळ्या साठी,..
दोघा मध्ये किती सारखे पण आहे ना .पण आहे एक फरक काही माणसे नाही आवडले तर त्याच्या साठी घराचे दार बंद करता येतात. ..
पण मनाचे काय आवडणारे आणि ना आवडणारे माणसे जेव्हा मनाच्या दारावर येतात तेव्हा ती दारे बंद पण करता येत नाही किती पण प्रयत्न केले तरी फक्त मनाचे दार बंद करण्याचे सोंग करता येतात .
 मनाचे काय असते खूप सारे स्वप्न गगनला भरारी घालयचे . .जे आपले नाही ते भेटत नाही तो पर्यन्ता त्याचा पिच्छा करयचा ,भेटल्या वर मग त्याची किमत मना साठी झिरो . .
पण घरच्या दाराला नसतात स्वप्नं,भावना ,आशा,निरशा कोण येते जाते त्याला त्यचे काही नसते .नसतात जखमा ,
पण मनच्या दारांना आशा , निरशा ,भावना ,सगळे असते दाराचे अस्तित्त्व किती जोपर्यंत त्यच्या वर ओरखडे येत नाही , लाकूड खराब होत नाही तो पर्यंत.तरी त्याचे उरते निर्जीव अस्तित्वा.
प्रत्यक दाराची कहाणी वेगळी असते . मन असते मोठे.कारण दाराला नसतात स्वप्नं,धेय्य आणी संकटाचे आयुश्य.मनाला सारे असते.मन जिंकून आणते सारे,कितीही खचले तरीही.त्याच्या कार्यशक्ती आणि जिद्दीने.आणि मग शेवटी विजय होतो मनाच्या दारांचा,जो असतो ठरलेला.कारण घराच्या दाराचे शरीर जळल्यावर..उरते फक्त राख.पण मन कितीही खचल...तरीही उरते त्याचे अस्तित्व शेवटपर्यंत.
{अस्मिता बागुल यांच्या पोस्ट वरून सुचलेले } .

मन

                                                  मन 

आपल्यला अगदी बालपणा पासून ते जीवनच्या अखेर पर्यंत अनेक माणसे भेटतात.मग त्या मध्ये आपले शेजारी, आपले नातेवाईक ,आपले शिक्षक ,आणि आपले मित्र ,अनेक जण असतात.पण काही व्यक्ती आपल्यला खूप आवडतात .काही तर असे  असतात त्यांच्याशी  आपण कधी बोलत पण नाही तरी देखील त्याच्या बद्दल आपल्या मनात खूप आदर असतो आणि  त्यांना आपण कधी विसरत नाही .या उलट काही व्यक्ती असा असतात त्या खूप काही करतात आपल्या साठी तरी देखील त्या आपल्यला आवडत नाही.आपण त्यांचा राग करतो असे पण नसते .शेवटी काय माणसाचे मन हे खूप अजिब असते .