आपल्याला कोणत्याही गोष्टींची लगेच सवय लागते. मग ती ट्रेन मधली सिट असो किवा अगदी आपला चहा/कॉफी चा कप. आपणच न काळात स्वताला सवय लाऊन घेतो, काही चांगल्या काही वाईट.अगदी जेवायचं ताट पण बदल्ल तर आपण अस्वथ होतो. तसाच माणसाना माणसांची सवय लागते. जसंआपली आई वडील आज्जी आजोबा बहिण भाऊ कितीही irritating असले तरी आपल्याला सवय असते त्यांच्या वागण्याची, त्यांच्या असण्याची. कधी आपण बाहेरून आलो आणि आपल्याला आपले घरचे दिसले नाही तर tension येत.
मग आपण त्यांची काळजी करायला लागतो. त्यांचा त्रासदायक सहवास हि आपल्याला हवा हवा सा वाटतो.
असाच काही आपल्या frnds सोबत हि होता. रोज collg ला जान त्याच frnds न रोज भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारन अगदी सगळा त्यांच्याशी share करण, आपल्याला त्यांची सवय लागते मग ते कसेही असो, पण जेव्हा आपल्या सवयीतले लोक दूर जातात किवा बदलतात तेव्हा त्या गोष्टींचा direct/indirect effect आपल्यावर होतो. त्या व्यक्तींचं दूर जान किवा बदलणं आपल्याला सहन होत नाही. आपल्याला आपल्याच सवयींचा त्रास होतो. त्या मुळे कोणत्याही गोष्टीची जास्त सवय लाऊन घेणा आपल्या साठीच त्रासदायक असू शक्त।:)