Tuesday, 17 January 2017

दादर

रोजच्या सारखी कॉलेजला जात होते .ट्रेन आली .तशी फारशी गर्दी नव्हती .छान खिडकी मधील जागा भेटली .सवय नुसार हेडफोन कानात घातला .एफ एम चालू केले .छान गाणे चालू होते .एक एक स्टेशन मागे जात होते .पुढचे स्टेशन दादर ,अशी अनाऊंसमेंट झाली त्याच वेळी एफ एम वर गाणे सुरु झाले .
"जिंदगी का सफर
हैं ये कैसा सफर
कोई समझा नही
कोई जाना नही....."
मी दादर स्टेशन वर उतरले .माझ्या समोरअसे दृ्य होते .कोणी ट्रेन पकडण्या साठी धावते तर कुठे तरी प्रेग्नंट महिला स्वतःला सांभाळत एका बाजूला खांबाला पकडून एकटी उभी  आहे .कुठे रडणाऱ्या मुला कडे दुर्लक्ष करून वैतागलेली आई त्याला खेचत घेऊन चालली आहे .कुठे वयस्कर व्यक्ती या गर्दीत स्वतःला वाहून घेता येत नाही म्हणून एक जागी उभी आहेत .कुठे कोपऱ्यात पुन्हा पुन्हा घड्याळ बघत एखादी प्रियकर /प्रेयसी एक दुसऱ्याची वाट बघत आहे .कुठे आज काही काम न भेटल्या मुळे उदासवाणे मजूर स्टेशन वर बसून आहे .एक ट्रेन येते एक जाते कोण येते कोण जाते .जो तो आपल्या  जीवनाचा भार वाहत आहे असे वाटते .
खरे तर नेहमी हे दृश्य हि गडबड दादर स्टेशनची शान आहे .येथे जीवन धावताना दिसते .लोक जगतात प्रोब्लेमना घेऊन आणि स्वताच त्याचे सोलूशेन शोधात ...
कोणी कोणा साठी थांबत नाही .
त्याच वेळी दुसरे गाणे सुरु झाले .
"ये जीवन हैं
इस जीवन का
यही हैं
यही हैं रंग रूप ....."