Thursday, 16 March 2017

गच्ची


सगळी कडे शांतता होती, रात्रीचा १ वाजला होता आणि त्या हॉटेल च्या गच्चीत ते दोघं समोर एकमेकान कडे नुसते बघत उभे होते, आकाशात खूप साऱ्या चांदण्या होत्या चंद्राच्या सुंदर प्रकाश पडला होता ,मनात खूप सारे प्रश्न घेऊन ते एकमेकान कडे बघत बसले .
काही वर्ष पूर्वी दोघं एकाच कॉलेज मध्ये शिकत होते,चांगले मित्र होते कॉलेज संपलं आणि ते स्वताच्याच जगात गुंग झाले ,आठवणी तर येत होत्या पण काय माहित मेसेज करावा कि नाही यात सगळा राहून गेलं,
आज तो त्याच्या बायको सोबत बाहेर आला होता आणि ती एका मीटिंग साठी
जग खूप छोटं आहे तिला नेहमी वाटायचा तो आपल्याला परत भेटेन कधी तरी कुठेतरी.....

लिफ्ट मध्ये त्यांची भेट झाली आणि ती लिफ्ट त्या गच्ची वर येऊन थांबली...
तिथे ते दोघेच होते
फक्त दोघे शब्दही नव्हते
त्याला त्याच्या बायकोचा कॉल आला आणि तोः लिफ्ट मधुन  परत गेला एका अनोळखी माणसा सारखा तिला परत एकटीला सोडून कायमचाच.....

ती गच्ची वर तशीच आकाशाकडे पाहत राहिली .............
दुरून गाण्याचा आवाज येत होता
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या 
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, 
अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्‍नात सावल्यांची 
कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला 
तुझ्याच जे अंतरात आहे ... 
बस एवढीशीच होती गोष्ट या इवल्याश्या जगातली :)

No comments:

Post a Comment