Sunday, 12 March 2017

बुरा न मानो होली है !!

बाहेर गोंगाट कानावर येत होता .नको वाटत होता तो आवाज ,दोन्ही कान बंद करून पण हा गोंगाट का कानावर येतो आहे ."नाही ऐकायचा मला हा आवाज "
म्हणे बुरा न मनो होळी है मला विचारा कितना बुरा होता हैं ये त्याव्हर !
एक वर्षा पूर्वी किती सुंदर होते माझे आयुष्य .
एकुलती एक मुलगी म्हणून किती लाडात वाढवले मला.
अभ्यासात हुशार होते मी .कॉम्पुटर इंजिनियर झाले .कुठेतरी छान नोकरी भेटली असती मला, पण मी निवडले शिक्षण क्षेत्र .एक कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी भेटली मला .कॉलेजचे ते वातावरण खूप आवडायचे मला.आजूबाजूला डोळ्यात खूप स्वप्न घेऊन फिरणारी ती मुले .खुश होते मी .घरा पासून फक्त तीन किलोमीटर वर कॉलेज होते .बाबानी छान स्कुटर घेऊन दिली होती .एक दिवस उशीर झाला .स्कुटर वेगात चालावताना अचानक स्कुटर स्लीप झाली काही कळण्या आधी रोडवर पडले मी .पाठी मागून एकदम जवळ येऊन एक गाडी थांबली त्यातून एक मुलगा उतरला .त्याने हात दिला ,उठवले पाणी दिले .स्कुटर उचलून दिली .पुन्हा पुन्हा मॅडम लागले तर नाही विचारात होता .मी मात्र त्याच्या कडे वेंधळ्या सारखी बघत होते .पडल्यामुळे केसाचा क्लिप तुटून केस मोकळे सुटले याचे मला भान नव्हते .तो मात्र माझा सुटलेल्या केसात हरवला होता .तीच माझी आणि त्याची पाहिले ओळख .नंतर भेटी होत गेल्या .काहो दिवसात लग्न ठरले .दिवस कसे भुरकून उडून जात होते,किती ती लग्नाची खरेदी .कुठे जायचे काय काय करायचे .दिवसातील किती वेळ फोन वर बोलण्यात जात होता .दोन दिवसाने होळी होती .त्या दिवशी आम्ही मस्त एक हॉटेल मध्ये डिनर केला .खूप सारे स्वप्न घेऊन मी त्याचा निरोप घेतला आणि घरी निघाले .आज सगळं कसं सुंदर वाटत होते .मस्त वातावरण होते .अचानक रस्त्यावर काही मुले येताना दिसली खूप मोठे टोळके होते ते ,मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत ते रंग खेळत होते,मीबाजूने जात होते .त्यातील काही मला माझा कडे येताना दिसले .दुसर्याच क्षणी मी जोरात किंचाळे ह.डोळे प्रचंड जळत होते .बुरा न मनो होळी चा आवाज कनावर येत होता .मी स्कुटर सहा पडले .बाजूचा आवाज शांत झाला .कोणी तरी मला घेऊन जात होते .नंतर हॉस्पिटल मधील वास .काही वेळाने शुद्ध गेली .
खूप वेळाने शुद्दीवर आले मी ,"तिच्या डोळ्यांना रंगा मधील केमिकल मुळे इजा झाली " ,एवढेच आपण ऐकले नकळत हात डोळ्या कडे गेले ,मोठे बँडेज हाताला लागले .माझी दृष्टी गेली होती ,त्या दिवशी माझ्या चेहरा खराब झाला होता ,तो कायमचाच ,काही दिवस तो येत राहिला .माझी नजर परत येईन की नाही .सांगता येणार नाही हे समजले आणि माझा नजरे सारखा तो मला सोडून गेला .हा दुहेरी आघात आज हि आपण पचवू नाही शकलो ..... आणि म्हणे बुरा न मानो होली है !
असे किती असतील या उत्सवाचे बळी होत असतील .माझा सारखे कायमचा एकच रंग घेऊन जगायला मजबूर फक्त काळा आणि काळा .
माझ्या इवल्याश्या जगातली हि एक जग उध्वस्त करणारी गोष्ट .
होळी खेळ पण कोणाचं जग उध्वस्त करू नका.....
happy holi.
Photo credit:- Harsh Salvi Photography
Story by :- Kishoree Melodious Londhe

No comments:

Post a Comment