Friday, 31 March 2017

गुढी पाडवा



गेल्या काही वर्षात नवीन वर्ष मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जाते .त्यामुळे गिरगाव येथे निघणाऱ्या शोभा यात्रेत गर्दी वाढू लागली आहे.अर्थातच सोशल मीडियाचा प्रभाव त्यामुळे कुठून कुठून लोक इथे येतात.
मी तर इथेच लहानाचा मोठा झालो सगळे मित्र मैत्रिणी आम्ही धम्माल करतो दर वर्षी .
मी मस्त फेटा आणि सफेद झब्बा घालून फिरत होतो .रुबाबदार दिसत होतो असे बरेच जण बोलले मला .
ऊन खूप होते,एका मित्राची वाट बघत मी सावलीत उभा होतो. सगळीकडे सुंदर मुलं मुली कोण कुठे सेल्फी
काढत आहे तर कोण कोणाला शोधताय .काही गर्मीत वैतागलेले .काही मुलींना नऊवारी सांभाळता येत नव्हती तर काही मुलांना मुली ..
गार्मिने एवढा घाम येत होता .तेवढ्यात वाऱ्याची एक झुळुक आली .आणि माझ्या समोर ती आली उन्हा मूळे लाल झालेला चेहरा, त्या आकाशी  नऊवारी मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती आणि मी तिच्या कडे बघतच राहिलो.
अचानक तिची नजर माझ्याकडे  गेली  आणि तिने चक्क माझा कडे बघून smile केले. मला काही समजेना ,
मी पण त्या क्षणीं तिला हाय केले.आणि ती निघून गेली .माझ्या जीवाला घोर लावून ,
कोण होती ती ?
नाव काय....?
परत कधी भेटेल का ?
आणि मी तिला दुसऱ्या रूपात ओळखेन का ..?
दोन दिवसात पासून तिचाच चेहरा दिसतोय
काय माहित आता फक्त वाट बघतोय ती पुढचा पाडवा येण्याची .
बस एवढीच होती गोष्ट या इवल्याश्या जगातली......

No comments:

Post a Comment