
आषाढ महिन्यातील आज दुसरी एकदशी ......
विठू माउलीचे अनेक भक्त होते तशीच एक
कान्होपात्रा हि एक.
ती एका नायकीणीची मुलगी होती मंगळवेढ्यात राहणाऱ्या शामा नायकीणीची ती मुलगी होती .अतिशय
सुंदर जशी चिखलात कमळ उमलते तशी .
नायकीणीची मुलगी असून देखील तिला देवाचे वेड होते .
ती सुंदर अभंग गायची ,तिचा गाण्याची आणि तिच्या सौदर्याची
चर्चा बेदरचा बादशहाच्या कानी पडली. त्यांनी आपले शिपाई
कान्होपात्रा कडे पाठवले जर येण्यास नकार दिला तर तिला उचलून
आणण्याची धमकी दिली शिपाई आल्यानन्तर कान्होपात्रा अजिबात
डगमगली नाही .कारण या मधून आपला पाडुरंग आपल्याला बाहेर काढणार
अशा तिला विस्वास होता .तिनी शिपयाना सांगितले कि तुम्ही थांबा मी देवाची
पूजा करून येते.देवळात गेल्यावर तिनी पाडुरंगाच्या चरणी आपले मस्तक ठेवले.
त्यावेळी तिच्या तोडून अतिशय प्रसिद्ध अभंग रचला गेला .
!! नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात !!
असे बोलून ती देवा कडे गेली
ती बाहेर येत नाही बघून शिपाई आत गेले तर तिचे मृत शरीर त्यांना दिसले .
हा अभंग पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय आर्त स्वर मध्ये गायला आहे .कान्होपात्राची व्याकुळता दिसते त्या मध्ये आणि तो आज देखील खूप प्रसिद्ध आहे
No comments:
Post a Comment