Thursday, 24 July 2014

सहज सुचालेले


माझे मन तुझे झाले हि माझी आवडती मालिका .... त्या मध्ये शेखर देसाईचा रोल एक प्रोफेसरचा आहे . गेले दोन तीन भाग पासून त्याच्या वर अडमिशन साठी पैसे मागितले असा आरोप होतो हे दाखवत आहे . कालचा एक प्रसंग एक पत्रकार फोन करतो आणि त्यांना सांगतो तुम्ही फोन घेत नाही म्हणजे तुम्ही दोषी आहे . आणि माझा वर अब्रू नुकसानचा दावा करायला तुमच्या सारख्या प्रोफेसर कडे एव्हडे पैसे आहे म्हणजे तुम्ही नक्कीच पैसे खाले . कॉलेजची मुले आणि प्राचार्य पण त्याच्या वर विस्वास ठेवत नाही . *एक साधा प्रसंग आहे हा मालिके मध्ये ..... पण खूप विचार करयला लावणारा अनेकदा आपण असे आरोप झालेले लोकांना आपण बघतो . आणि आपण त्यांना दोषी ठरवतो पण आपण कधी विचार करत नाही खरच ती व्यक्ती दोषी असेल का तिनी हा अपराध केला असेल का ? मिडिया जे दाखवते किवा न्यूज पेपर जे लिहितात तेच आपण खरे समजतो . अनेकदा त्या व्यक्ती दोषी देखील नसतात . मग असे परिवार बदनामी सहन करू शकत नाही . घर उद्वस्त होते. ज्या व्यक्ती वर आरोप झाला ती व्यक्ती दोषी नसेल तर आत्महत्या देखील करते . पण जेव्हा एखादी व्यक्ती या विरुद्ध लढते आणि स्वताला निर्दोष साबित करते.तेव्हा कधी कोणत्या पेपर मध्ये किवा मिडीया मध्ये हि बातमी नसते . म्हणजे ज्यांनी ज्यांनी ती बातमी बघितली होती तीच त्याच्या साठी खरे असते . त्याच्या मनात हि व्यक्ती कायम दोषीच राहते . म्हणजे काय जे विकते तेच दाखवयचे तेच लिहीयाचे . {सावधान इडिया फाईट ब्याक मध्ये देशभर गाजलेला एक भाग दाखवला होता कोलकत्त्याच्या होता कदाचित .एक चांगल्या शिक्षका वर एक मुलीनी विनयभंगाचा आरोप केला होता .ती त्याच्यावर प्रेम करत असते आणि त्याचा लग्न दुसरी कडे होणार म्हणून हे सगळे होते .पण मिडीया अनेक संघटना हे प्रकरण उचलून धरतात .त्याचे घरा बाहेर पडणे मुश्कील होते मग तो शिक्षक आत्महत्या करतो शेवटी तो लिहितो आई वडिलांना मी निर्दोष आहे . आणि त्याच दिवशी हि मुलगी हे खोटे आहे हे पोलिसाना सांगते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो .} एखादी बातमी देतानी विचार करयची गरज का नाही वाटत .का फक्त आम्हीच सगळ्यात आधी बातमी दिले हे सांगयची घाई फक्त .

No comments:

Post a Comment