Wednesday, 22 October 2014

दिवाळी

दिवाळी सण मोठा आनंदाला नाही तोटा ....
सगळ्यात मोठा हा सन ,शाळेला सुट्या असतात .म्हणून मुले खूप खुश असतात .
बाजारात छान छान कपडे येतात ..
मग दिवाळी छान खरेदी होते .
पण एक गोष्ट कधी कोणाच्या लक्षात येते का ????????
जर आपण बाजारात गेलो तर पणत्या विकणारी तशेच कंदील
बनवणारे .अनेक छोटे मुले दिसतात काही मुले रांगोळ्या विकतात .
आपण किती सहज त्याच्या कडून सामान घेतो .
खरच कधी मनात विचार येतो का आपल्या या मुलांना आई वडील
आहेत का ?
त्याच्या कडे होत असेल का दिवाळी .????
दादर सारख्या ठिकाणी फुल बाजारात तर असे खूप मुले
हार बनवत असतात .विकत असतात .
त्याच्या साठी सगळे दिवस सारखेच असतील का ?
दिवाळीत आपल्या घरी आपण दिवाळी फराळ बनवतो .
घरी येणार्यांना आपण ते नको नको म्हणत असतानी
त्यांना फराळ देत असतो .
मला वाटते असा मुलांना खरच कधी तरी आपण काही द्यावे असे
वाटते का .पण आपण एक तर करू शकतो .त्याच्या कडून
त्यांनी बनवलेले सामान कोणता भाव न करता विकत घेऊ शकतो .
खरच असे करून बघा .मी केले आहे असे .
मग बघा त्याचा हसरा चेहरा .
नक्कीच दिवाळीत एक आनंदा भेटेल .......
HAPPY DIWALI.....................




No comments:

Post a Comment