सकाळी पेपर उघडला आणि बातमी वर नजर गेली. १९९३ च्या साखळी बॉम्ब स्पोट मध्ये सहभागी असलेल्या एका गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तारीख जाहीर झाली ती बातमी होती. याला फाशी देवून का गेलेले जीव परत येणार आहे का ? मनात आले . रोजच्या सारखा ऑफिसला निघालो .बिल्डींग खाली आलो आणि नजर समोरच्या फुटपाथ वर गेली. शांता मावशी नेहमी सारखी आपली भाजी घेवून बसली होती.वय सत्तरच्या पुढे, खरे तर त्यांना आता नीट चालवत देखील नाही.
जगण्यासाठी त्यांच्याकडे भाजी विकण्या शिवाय पर्याय नाही. त्यांच्याकडे जावे आणि त्यांना पेपर मधील बातमी सांगावी वाटली पण परत मनात आले नको त्यांच्या दुखा वरील खपली काढायला,पण काय माहिती त्यांना बरे वाटेल कदाचित. मी रस्ता पार करून शांताबाई जवळ गेलो.त्यांनी वर बघितले
"काय देऊ सगळी भाजी ताजी आहे आज "शांताबाईना वाटले मला भाजी हवी आहे. मी नाही म्हणून मान हलवली आणि खाली बसलो. शांताबाईचा हात हातात घेतला. मावशी तुम्हाला माहिती आहे का आज पेपर मध्ये काय आले आहे. मी त्यांना पेपर मधील बातमी सांगितली.
"देवाच्या दारात न्याय आहे म्हणायचे तर " असे बोलून त्यांनी आकाशा कडे बघून हात जोडले. मी काही बोललो नाही शांताबाई मात्र भूतकाळात गेल्या.बावीस तेवीस वर्षा पूर्वी त्यांचा पण एक सुखी संसार होता. झोपडपट्टीत का असेना एक छोटे घर होते. एक मुलगा आणि पती बरोबर त्या सुखी होत्या. आपल्या मुलाला खूप शिकवायचे हे त्यांचे स्वप्न होते. दादर सारख्या भागात वडापावची गाडी होती. खूप सकाळी आपण उठून सगळी तयारी करून आपल्या पती बरोबर जात असे ,पण त्या कष्टाचे काही वाटत नसे,कारण मनात एकच विचार होता. आपल्या मुलाला खूप शिकवायचे मोठे करायचे या सगळ्या त्रासातून बाहेर काढायचे.नशिबाने आपला मुलगा किती हुशार आहे किती अभ्यास करतो. बाकीच्या वेळेत वडिला बरोबर वडापावच्या गाडीवर मदतसुद्धा करतो. किती खुश होतो आपण जेव्हा दहावीला तो शाळेत पहिला आला होता.दादरच्या एका नामंकित कॉलेज मध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले.या अडाणी आई बापाच्या पोटी आलेला हा हिरा बघता बघता पदवीधर इंजिनियर झाला.स्वताच्या हुशारी मुळे एक मोठ्या कंपनीत कामाला लागला. शांताबाई समोर तो दिवस तसाचा तसा उभा राहिला. नेहमी सारखे आपण वडापावच्या गाडीवर काम करत होतो.संध्याकाळची वेळ होती. गाडीवर गर्दी जास्त होती.आपले काम चालू होते, कुठे बघायला फुरसत नव्हती. "आई !" अशी जोरात आरोळी आली. आपण मागे फिरून बघेपर्यंत आपल्याला आपल्या या लेकाने उचलून घेतले होते. "मला नोकरी लागली आता या पुढे गाडी बंद" किती उत्साह होता त्याच्या बोलण्यात आज आमच्या कष्टाचे चीज झाल्याचे दिसत होते. लोक बघत होते माझ्या डोळ्यात पाणी होते. त्याच्या वडिलांच्यापण डोळ्यात पाणी आले होते. त्या दिवशी आम्ही बाहेर जेवण केले. त्याचा हट्ट होता आम्ही वडापावची गाडी आता बंद करावी. कंपनी कडून घर भेटले तिथे राहायला जायचे ठरले. ते किती छान आणि मोठे घर होते. त्याच्या मना सारखे करायचे ठरले खूप वर्ष आम्ही जगणे विसरलो होतो .फ़क्त काम आणि काम केले होते. नवीन घरात जाण्या आधी आपली गाडी कोणाला चालवण्यास देवू असे ठरले. नवीन घरात जायचे म्हणून सामान बांधत होतो. आपला नवरा गाडी बघयला आलेल्या लोकाना गाडी दाखवण्यास गेले होते. काही सामान घरी आणयचे होते ते आणायला त्यांना एकट्याला जमणार नाही म्हणून मुलगा देखील गेला.
जगण्या साठी काही तरी करणे भाग आहे म्हणून भाजी विकते. आज माझा मुलगा असता तर ??
शांताबाई रडत होत्या आणि विचारात होत्या माझा पती आणि मुलाने काय कोणाचा गुन्हा केला होता का ?
"आज त्या पापिला फासी होईल पण आमची माणसे परत येणार नाही पण आज त्याच्या घरच्या माणसाना नक्की समजेल आपले कोणी जाण्याचे दु:ख काय असते " आज देवाने न्याय केला.

आज पण आठवते तो दिवस आपण येथून नवीन घरात जाणार म्हणून एकीकडे खूप खुश होतो तर दुसरी कडे चांगले शेजारी सोडून जाताणी मन खूप भरून येत होते.सकाळ पासून दहा वेळा कोणी ना कोणी सारखे येत होते. दोघा बापलेकांना जावून खूप वेळ झाला होतां. मी आपली वाट बघत होते. शेजारचा राजू एकदम जोरात धावत येतानी दिसला. "बॉम्ब स्पोट झाला आहे दादर मध्ये" तो बोलत होता. बस हे ऐकले आणि मी धावत सुटले. सगळीकडे नुसता गोंधळ होता. टॅक्सी थांबत नव्हती. रुग्णवाहिकेच्या आवाजाने वातावरण अजून भीतीदायक झाले होते.मी रस्त्याने सैरवैर धावत होते. जिथे आमची वडापावची गाडी होती तो परिसर सगळा पोलिसांनी वेढला होता. कुठे काय समजत नव्हते. पोलिसांना विचारले त्यांनी सांगितले सगळे जखमी के इ .एम हॉस्पिटलं मध्ये नेले आहे तिकडे जावून बघा. तिथे तर काही समजत नव्हते. माझ्या सारखे अनेक लोक आपल्या नातेवाईकांना शोधत होते. जवळून स्ट्रेचर जात होती. त्यावरील व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून माझा नवरा होता. ते बघून माझी शुद्ध गेली. किती वेळ मी बेशुध्द होतो माहिती नाही. शुद्ध आली आणि परत मी वेड्या सारखे मुलाला शोधायला लागलो. मावशी तुमचा मुलगा इकडे आहे. समोर आमचे शेजारी होते. माझ्या पोटचा गोळा तरी ठीक आहे असे वाटले पण नाही नशिबाने आमची परीक्षा घेण्याचे ठरवले होते. मुलगा जिवंत असून नसल्यासारखा समोर पडला होता. त्याच्या डोक्यात खूप जखमा झाल्या होत्या आणि तो कोमात गेला होता असे डॉक्टर बोलले. शेजार्यांनी पुढे होवून नवरयाचा अंत संस्कार पार पडला. काय होते काय चालू आहे काही समजत नव्हते. नशिबाची परीक्षा सुरु झाली. मुलगा तरी वाचावा म्हणून जवळ होते नव्हते ते सगळे पैसे घालवले. पण एक दिवस मुलगा सोडून गेला. "काय होते आणि काय झाले " मनाने खचले पण मदतीला आले शेजारी पुन्हा जगण्याची इच्छा नव्हती पण मरु म्हटले तर मरण येते का ?
जगण्या साठी काही तरी करणे भाग आहे म्हणून भाजी विकते. आज माझा मुलगा असता तर ??
शांताबाई रडत होत्या आणि विचारात होत्या माझा पती आणि मुलाने काय कोणाचा गुन्हा केला होता का ?
"आज त्या पापिला फासी होईल पण आमची माणसे परत येणार नाही पण आज त्याच्या घरच्या माणसाना नक्की समजेल आपले कोणी जाण्याचे दु:ख काय असते " आज देवाने न्याय केला.
No comments:
Post a Comment