रोज सकाळी उठून मुलीचा आणि नवर्याचा डब्बा बनवणे हे तिचा पहिला काम
मग मुलगी शाळेत आणि नवरा कामावर गेल्यावर शांत पणे चहा पिउन बाकीची काम करणे .
अशी असायची तिची सकाळ
हे तिला आत्ता नेहमीचाच झालं होत,आधी मुलीचा अभ्यास घेत असे पणआशा आता कामातून थोडा वेळ काढून ती नेहमी पेपर आणि लेखकांची पुस्तक
वाचण्यात वेळ घालवत . नाही तर टीव्ही बघत कशा तरी वेळ घालवत असे .
मुलगीची १० विची परीक्षा झाली . सुट्टी होती काही दिवस तिला खूप बरे
वाटले पण नंतर खूप कंटाळा येऊ लागला .
मग तिचा मनात येऊ लागले . आपली आई कशी राहते रोज घरात .
१० विचा निकाल लागला आणि एकदिवस तिच्या घरी संगणक आले ,
त्याच्या दुसर्या दिवशीची सकाळ तिच्या साठी वेगळी होती ,काम आवरून ती आज त्या संगणकाला बघत बसली . त्याला तिने हाथ पण नाही लावला ,
उगीच आपण हाथ लावायला आणि काही व्हायला निम्मित्त नको , या पासून आपण लांबच राहू .
संध्याकाळी college मधून तिची मुलगी आली
लगेच संगणक चालू करून games खेळत बसली ,बाकी खूप काही करत होती .
पण आशा लांबून फक्त बघत बसली .
असेच काही दिवस गेले , हळू हळू तिची संगणका बद्दल ची उत्सुकता वाढू लागली
अश्याच एक संध्याकाळी ती मुलीला बोलली माला जमेल हे .? तिच्या मनात खूप प्रश्न
पण मला शिकव असे बोलण्या आधी तिला मुलीनी संगणक शिकायला लावले
या गोष्टीला बरेच वर्ष उलटून गेले. आजची तिची सकाळ ती काही वर्षान
इंटरनेटच्या जगात तिने स्वताची ओळख शोधली आहे .आज तिचा स्वताचा ब्लॉग आहे ,
अनेक जण तिच्या ब्लोग चे follower आहेत. घरात बसूनही आज तिने स्वताची ओळख बनवली आहे .
आपल्याला आपल्या जिवनातील बदलांना स्वीकारता आलं पाहिजे. आपण मरेपर्यंत शिकतच असतो पण शिकलेल्या गोष्टींचा योग्य वापर कारनं आपल्या हातात असतं.
नवीन आधुनिक जगाला नावं न ठेवता त्याला समजून त्याचा योग्य वापर करनं हे आपल्यावर असतं .
तिने स्वताच्या जिवनात बदल तर आणलाच आणि दुसर्यांना हि दिशा दाखवली आहे,
हिच खरी आधुनिक जगातील आशा
No comments:
Post a Comment